Tag Archives: जिकडे जावे तिकडे

जिकडे जावे तिकडे

जिकडे जावे तिकडे सारा बाजार असे भरलेला
माणुस विकतो माणूसकीला भाव असे ठरलेला
पेटलेल्या गावातून पाहणारांची गर्दी दाटे
पुढे होऊन विझविण्यासाठी कुणी नसे उरलेला
नादात भांडणाच्या रक्त सांडले चोहीकडे
सोडविणारा कोण आहे हात त्याचा धरलेला
सारीकडे भ्रष्टाचार अनागोंदीस पूर येतो
पावलो पावली नीत्तिमतेला जो तो विसरलेला
बोलतो कोण ऐकतो कोण ईशाऱ्यातील भाषा सारी
खून, दरोडे, चोऱ्या मारून कुणी असे पुरलेला
भेटलेला कोण कसा ओळखायला शिकू या
जीवन सारे अवघड झाले हाच मार्ग असे उरलेला