Tag Archives: जिल्हा

पुण्याच्या पावसाबाबत प्रश्नचिन्हच

पुण्याच्या पावसाबाबत प्रश्नचिन्हच

पुण्याच्या पावसाबाबत प्रश्नचिन्हच

सरासरीच्या ७६ टक्के पाऊस पुणे शहरात कमी झाला असून, जिल्ह्यात हेच प्रमाण सरासरीपेक्षा ६२ टक्के कमी आहे.

यंदा सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिली असून, जूनमध्ये गेल्या दशकातील नीचांकी पावसाची नोंद झाली. जुलैच्या पहिल्या १०-१२ दिवसांतही पावसाची परिस्थिती फारशी बदललेली नाही. आपली तुरळक सर दाखवून पाऊस विश्रांतीच घेत आहे. शहरातील पावसाची सरासरी १२ जुलैपर्यंत २१२ मिमी आहे. ५१.६ मिमी पाऊस गुरुवारी सकाळी साडेआठ पर्यंत झाला. तब्बल १६० मिमीने सरासरीपेक्षा हा पाऊस कमी आहे. सुरुवातीपासूनच पावसाने आपले अस्तित्व न दाखवल्यामुळे सरासरीच्या २५ टक्क्यांपर्यंतची मजलही पावसाला गाठता आलेली नाही. देशातील बहुतांश भागांत जोरदार पाऊस झाला मात्र, पुण्यात अजूनही याबाबत प्रश्नचिन्हे आहे.

जिल्ह्यातही पुण्यासारखीच परिस्थिती आहे. जिल्ह्यात सरासरी पावणेतीनशे मिमी पाऊस पडण्याची अपेक्षा होती पण यंदा फक्त १०६ मिमी पाऊस पडला आहे. ६२ टक्क्यांनी हे प्रमाण कमी आहे. जर ६० टक्क्यांहून पाऊस कमी पडला तर हवामान विभागाच्या मापदंडानुसार ‘तुरळक पाऊस’ म्हणून त्याची नोंद होते. राज्यात फक्त पुणे शहरातच ही स्थिती असल्याचे दिसून येते.