Tag Archives: जीवनफंडा

जीवनफंडा या पुस्तकाचे प्रकाशन

डॉ. स्वप्ना पाटकर आणि स्वप्नील जोशी

डॉ. स्वप्ना पाटकर आणि स्वप्नील जोशी

डॉ. स्वप्ना पाटकर लिखित ‘जीवनफंडा’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी (दि. २९) सायंकाळी साडेपाच वाजता क्रॉसवर्ड (सेनापती बापट मार्ग) येथे झाले. अभिनेते स्वप्नील जोशी आणि मानसी नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून तेथे उपस्थित होते.

डॉ. स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत, जे ‘सामना’चे कार्यकारी संपादक आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे पुस्तक लिहिले आहे. डॉ. स्वप्ना पाटकर यांचे लेख सामना वृत्तपत्रात येतात. त्या सगळ्यांचा साठा तयार करुन त्यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. अमेय प्रकाशनातर्फे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

विधानपरिषदेचे श्री. विनोद तावडे हे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते व त्यावेळी उपस्थित होते.