Tag Archives: जीवनसत्वे

अल्पमोली आणि बहुगुणी गाजर

अल्पमोली आणि बहुगुणी गाजर

अल्पमोली आणि बहुगुणी गाजर

खरबरीत व सुक्या त्वचेसाठी गाजराचा रस काढून तो त्वचेवर चोळल्यास त्वचा सतेज नि गुळगुळीत बनते. जेवल्यानंतर तोंड धुण्यापुर्वी गाजर चावुन खाल्यास तोंडातील जंतू मरतात. दात स्वच्छ होतात. दातात अडकलेले अन्नकण निघून जातात. हिरड्यातून रक्त येण्याचे थांबते आणि दात किडत नाही कारण गाजरात क्लोरीन व आयोडिन आणि अ‍ॅसिडयुक्त तीन घटक विपुल प्रमाणात असतात.

पोटात जंत झाल्यास अनाशापोटी किसलेले गाजर खावे. आतड्यावरील सूज किंवा व्रण गाजराचा रस घेतल्यानेही नाहीसे होतात. गाजराचा रस क्षयरोगाला प्रतिबंध करतो गाजराच्या रसाने स्त्रियांना मासिक पाळीत होणारा त्रास कमी होतो. गाजर वंध्यत्व दूर करण्यास मदत करते. कॅन्सरलाही प्रतिबंध करते. गाजरातील टॉकोकिनीन हा घटक मधुमेह कमी करण्यास मदत करतो. गाजरात विपुल खनिजे व अ, ब, ई, सी जीवनसत्वे असल्यामुळे असंख्य व्याधींवर ते गुणकारी आहे.