Tag Archives: झटपट डोसा

झटपट डोसा

झटपट डोसा

झटपट डोसा

साहित्य :

  • १ वाटी बारीक रवा
  • १ वाटी तांदळाची पिठी
  • १ वाटी मैदा
  • १ वाटी आंबट दही
  • तेल
  • मीठ

कृती :

डोसे करायच्या आधी २ तास १ वाटी बारीक रवा, १ वाटी तांदळाची पिठी, १ वाटी मैदा, १ वाटी आंबट दही घालुन सरसरीत भिजवावे. त्यात २ टेबलस्पून कडकडीत तेल व चवीला मिठ घालावे. डोशाकरता मिठाचे पाणी लावून तयार केलेल्या तव्यावर डावाने पातळ धिरड्याप्रमाणे डोसा घालावा व पाव चमचा तेल सोडून हलकेच काढून चटणीबरोबर द्यावा.