Tag Archives: झुरळ

गरम मिसळीतलं झुरळ

हॉटेलमध्ये गेलेला एक इसम गरम गरम मिसळ खात असता त्याला त्या मिसळीत एक मेलेलं झुरळ सापडलं. त्याबरोबर मिसळ आणून देणाऱ्या पोऱ्याला हाक मारून तो रागानं म्हणाला, “या मिसळीत बघ, मेलेलं झुरळ आलंय!”
यावर तो पोऱ्या म्हणाला, “तुम्हा गिऱ्हाइकांना मिसळ तर गरमागरम हवी असते. मग गरम मिसळीतलं झुरळ जिवंत कसं राहील? उष्णतेमुळं ते मरणारच.”