Tag Archives: टॉमॅटो

सांभर

साहित्य:

 • २५० गॅम तुरडाळ
 • १/२ लहन चमचा मोहरी
 • १/२ लहान चमचा हळद पावडर
 • १ लहान चमचा धणे पावडर
 • ५० ग्रॅम चिंच
 • १/२ लहान चमचा गरम मसाला
 • १ लहान चमचा दाणा मेथी
 • १ लहान चमचा तांदूळ
 • १/२ लहान चमचा लाल तिखट पावडर
 • ४ कांदे
 • १ हिरवी मिरची
 • २ मोठे चमचे तूप
 • ४ टॉमॅटो
 • १ तुकडा आले

 

कृती:

सांभर

सांभर

तूरडाळ १ तास भिजवून  नंतर मीठ हळद टाकून कुकरमध्ये शिजवून घ्या. आता एका कढईत तेल-तूप न टाकता दाणा मेथी, उडद डाळ, चणे डाळ, व तांदूळ भाजून घ्या.

गॅस बंद करून धणे पावडर व लाल तिखट टाकून ५ मिनीटे झाकून ठेवा. हे सर्व वाटून घ्या. कांदा, टॉमेटो, आल व हिरवी मिरची बारीक चिरून घ्या.

एका कढईत तूप गरम करून मोहरीची फोडणी द्या. कांदा परतून, आलं, हिरवी मिरची, कढी-पत्ता टाका. आता टॉमेटो टाकून नीट परतून घ्या.

सर्व मसाले टाकून भाजून घ्या व गॅस बंद करा. हे सर्व मसाले उकडलेल्या डाळीत मिक्स करा.