Tag Archives: टोलनाका

माझा हंगामा आवरता येणार नाही

राज ठाकरे

राज ठाकरे

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरोप केला आहे की, महाराष्ट्रात कंत्राटदार टोलनाक्यांच्या माध्यमातून आणि दररोज कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार राजकारण्यांच्या संगनमताने सुरु आहे. कंत्राटदार, एमएसआरडीसी आणि सार्वजनिक बांधकाम खाते या सगळ्याला जबाबदार आहे. सोमवारपासून प्रत्येक टोलनाक्यावर मनसेचे कार्यकर्ते हा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी येणारी जाणारी वाहने मोजून १५ दिवसांचा अहवाल तयार करतील. जर या कार्यात कोणी आडकाठी करण्याचा प्रयत्न केला तर, मी महाराष्ट्रात असा हंगामा करीन जो आवरणे कठीण होईल, असा कडक इशारा त्यांनी केला.

शुक्रवारी ‘कृष्ण्कुंज’ येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती व यात राज ठाकरे बोलत होते. राज्य सरकारच्या पदरात टोलनाक्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा महसूल जरी पडत असला, तरीही त्यातून बांधलेल्या रस्त्यांचा खर्च व व्याज सूटत नाही. ह्या कंत्राटदार कंपन्या टोलनाक्यावरून पैसे गोळा करतात पण संबंधित रस्त्यांवर सुविधांची सोय करुन देत नाहीत. टोलनाक्यावर आपण बोललो, तर ते काय म्हणाले? छगन भुजबळांच्या रोजीरोटीवर आपण लाथ मारली. राज्य कसे हाकायचे याची शिकवण मला देण्याच्या भानगडीत भुजबळांनी पडू नये, असे ठोस प्रत्युतर राज ठाकरे यांनी भुजबळांना दिले.