Tag Archives: डाळिंब

फळांचा रायता

साहित्य:

  • २ कप दही
  • ४ लहान चमचे साखर पावडर
  • १ संत्री
  • १/२ कप सोललेले डाळिंब
  • १/२ कप द्राक्षे
  • १ लहान सफरचंद

कृती:

फळांचा रायता

फळांचा रायता

संत्री सोलून घ्या. सफरचंद सोलून लहान चौकोनी चिरा.

दही रवीने एकत्र करा. साखर व सर्व फळे टाकून एकत्र करा.

फ्रिज मध्ये ठेवा व गार वाढा.