Tag Archives: डाळीचा चिवडा

डाळीचा चिवडा

साहित्य :

  • ३ वाट्या हरबर्‍याची डाळ
  • दीड वाटी शेंगदाणे (भाजून सोललेले)
  • १ वाटी खोबऱ्याचे पातळ काप
  • २ वाट्या तयार तिखट शेव
  • तिखट
  • मीठ
  • थोडी साखर
  • हळद
  • हिंग
  • तेल.

कृती :

हरभर्‍याची डाळ ३ ते ४ तास भिजवावी. भिजत घालताना त्यात थोडी तुरटीची पूड घाला. डाळ चाळणीत उपसून, कपड्यावर पसरून थोडी कोरदी करा. मोथ्या गाळण्यातून तेलात तळावी व बाजूला ठेवावी.थोड्या तेलाची हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी करा. त्यात खोबऱ्याचे काप घालून परतावे. जरा लालसर झाले की त्यात शेंगदाणे घाला. जरा परतून खाली उतरवा. मोठ्या कागदावर तळलेली डाळ पसरावी. त्यावर तळलेले दाणे व खोबरे पसरावे. त्यावर तिखट, मीठ, थोडा कच्चा हिंग, थोडी साखर घालून मिश्रण कालवावे. त्यात तयार शेव कुसकरून घालावी.आवडत असल्यास फोडणीत लसूण घालावी.