Tag Archives: डाळीच्या पिठाचा झुणका

डाळीच्या पिठाचा झुणका

साहित्य :

  • २ वाट्या डाळीचे पीठ
  • ४-५ हिरव्या मिरच्या
  • मीठ
  • कोथिंबीर
  • पाव वाटी तेल
  • फोडणीचे साहित्य
  • मिरच्या नसल्यास १ चमचा लाल तिखट

कृती :

डाळीच्या पिठात १ भांडे पाणी घालून त्यात हळद, तिखट, मीठ घालावे. फोडणीत मोहरी,हळद, लसणाच्या ५-६ पाकळ्या घालून हे कालवलेले पीठ ओतावे. आपल्याला हवे तेवढे कोरडे होईपर्यंत ढवळत रहावे. कोरडे पिठले किंवा झुणका प्रवासात नेण्यास चांगला वाटतो व टिकतोही.