Tag Archives: डिंक

बेसन कणीक लाडू

साहित्य :

  • १ वाटी हरबऱ्याच्या डाळीचे पीठ
  • २ वाट्या कणीक
  • ५-६ वेलदोड्याची पूड
  • २ वाट्या बारीक चिरलेला गूळ
  • साजूक तूप
  • २ टे. चमचा खसखस भाजून पूड करावी
  • ४ टे. चमचा खोबऱ्याचा किस भाजून घ्यावा
  • २ टे. चमचा तळलेला डिंक.

कृती :

तुपावर दोन्ही पिठे वेगवेगळी भाजून घ्या. पीठ भाजत आले की त्यावर पाण्याचा शिपका द्या व पुनः जरा भाजा. नंतर सर्व एकत्र करून लाडू वळा.