Tag Archives: डिस्कव्हरी किड्स

बालचमूची मिस्ट्री हंटिंग

मिस्ट्री हंटर्स इंडिया

मिस्ट्री हंटर्स इंडिया

अनेक ऎतिहासिक वास्तूमागे काही रहस्य दडलेली असतात. या रहस्याबाबात अनेकदा आपल्या मनात उत्सुकताही असते. पण ही रहस्ये अनेकदा या वारशांप्रमाणे पिढीजात चालत आलेली असतात. रहस्यांची सत्यता किंवा त्यामागची कारणं यापासून आपण कायमच अनभिज्ञ असतो. पण आता या सर्व उत्सुकता आणि जिज्ञासा शमवण्यासाठी डिस्कव्हरी किड्स ने ‘मिस्ट्री हंटर्स इंडिया’ ही नवीन मालिका सूरू केली आहे. शनिवारवाड्यातून काका मला वाचवा असा आवाज का येतो? अहमदाबाद येथील झूलता मनोरा हलत असल्याचा का भास होतो अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिस्टरी हटर्स इंडिया या मालिकेतून आपल्याला मिळणार आहे.

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, केरळ, राजस्थान आणि दिल्ली या राज्यांमधील गूढकथा या मालिकेत उलगडणार आहे. अपुर्वा आणि हिमांशू हे दोन बालकलाकार विविध रहस्यांचा शोध घेऊन त्याबद्दल माहिती मिळवणार आहे आणि शो चे सूत्र संचालनही करणार आहे.. तसेच मिस्ट्री हंटर्स चा तिसरा सदस्य मंत्रा हा वैज्ञानिक आहे. मंत्रा आपल्या मजेदार प्रयोगांचा वापर करून अनेक रहस्यमय प्रश्नांचा गुंता सोडवणार आहे.

मध्यप्रदेशात असलेल्या ऎतिहासिक चित्रामागील रहस्य तसेच केरळ मधील २०० वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या आणि नंतर लुप्त झालेले पिग्मी हत्तीं अशा अनेक गूढकथांचे रह्स्य या मालिकेत उलगडणार आहे. मिस्ट्री हंटर्स त्रिकूट भारतातील रहस्यमय ठिकाणांचा शोध घेणार आहे. यात पुरात्तव तसेच नैसर्गिक आश्चर्य, शापित गावे, घनदाट जंगले आणि पडद्याआड राहिलेली अनेक रहस्ये ही मालिका उजेडात आणणार आहे.

डिस्कव्हरी कीड्स ने प्रथमच भारतावर आधारित मालिका सुरू केली आहे. ही मालिका २२ डिसेंबरपासून दरोरोज सायंकाळी ६ वाजता डिस्कवरी किड्सवर पाहता येणार आहे.