Tag Archives: डेक्कन एज्युकेशन सोसायटी

गोपाळ गणेश आगरकर

गोपाळ गणेश आगरकर

गोपाळ गणेश आगरकर

जन्म : १४ जुलै १८५६

मृत्यू : १८९५

सातारा जिल्ह्यात कऱ्हाडजवळ टेंभू नावाच्या खेड्यात जन्म झाला. त्यांनी लोकशिक्षणाचा पाठपुरावा केला. बुद्धी, व्यक्तिस्वातंत्र्य आणि ऐहिक सुखसंवर्धन ही त्यांच्या विचारसृष्टीचे नियमन करणारे तीन तत्त्वे होती. ते बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक (१८८०-१८८१) होते.

पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ते व लोकमान्य टिळक एकत्र आले. तोपर्यंत स्वदेशसेवेची प्रेरणा दोघांच्याही मनात जागी झाली होती. दिनांक १ जानेवारी, १८८० रोजी विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. आगरकर १८८१ मध्ये एम. ए. झाल्यावर चिपळूणकरांना जाऊन मिळाले. आगरकर व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’, तर मराठीतून ‘केसरी’ अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले.

पुढे लोकमान्य टिळक व आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व त्या अंतर्गत १८८५ साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले, पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले.

१८८४ साली बाळ गंगाधर टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि आगरकरांनी पुण्यात ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ स्थापली. १८८८ साली त्यांनी ‘सुधारक’ हे वृत्तपत्र सुरू केले.