Tag Archives: डॉ. रजनीकांत आरोळे

ग्रामिण स्त्रिचे आरोग्य प्रश्न

ग्रामीण स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी स्वतःच्या पायावा उभे राहायला हवं तरंच त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं आरोग्य सुधारण्यास वेग येईल. भारतातल्या ग्रामीण भागात राहाणाऱ्या प्रत्येक स्त्री-पुरुष आणि मुलाला ‘संपूर्ण सर्वांगीण आरोग्य’ मिळणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि हा हक्क अस्तित्वात वास्तवात आणण्यासाठी त्यांना ज्ञान प्राप्त करून देणं ही सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट आहे. पन हे करण्यासाठी त्यांना मिळणारी वैद्यकिय मदत अत्यंत अपुरी असते. या जनतेला ही जी मदत हवी आहे तिचे एकूण लोकसंख्या ३७ टक्के प्रमाण आहे ही बाबही लक्षात घेण्यासारखी आहे. आपल्या लोकसंख्येच्या ३७ टक्के लोक वैद्यकीय मदतील वंचित आहेत असंही इथं खेदानं नमूद करायला हवं.

कोणत्याही समाजाचा किंवा देशाचा विकास हा त्या समाजातील देशातील स्त्री आणि मुलांचा सर्वांगीण विकास किती झाल आहे यावर अवलंबून असतो.आपल्या ग्रामीण भागातील बालमृत्यूचं प्रमाण हे हजाराला एकशेवीस आहे. तर जपानमध्ये हे प्रमाण हजारत फक्त दहा आहे. श्रीलंकासारख्या प्रगतशील देशात हेच प्रमाण पंचेचाळीस आहे. स्त्रीचे आरोग्य या देशात अत्यंत खालच्या पातळीवरचे आहे. अपवाद फक्त लैंगिकबाबातीत स्त्रिया या लैंगिकदृष्ट्या पुरुषापेक्षा जास्त बलवान असतात पण भारतात आता ही स्थिती घसरत चालली आहे. याला कारण तिच्या वाट्याला येणारी जास्त बाळंतपण आणि बालमृत्यूचे प्रमाण.ग्रामीण स्त्रिया किरकोळ आजाराकडे दुर्लक्ष करतात आणि या सततच्या दुर्लक्षतेमुळं गंभीर आजारात रुपांतर होते. दुषित पाणी स्वच्छ्तेची विकृष्ट व्यवस्था, याबरोबरच रूढी परंपरा यामुळे आरोग्य प्रश्न निर्माण होत जातात. पुरुषाची स्त्रीशी असलेली बेफिकीरीची वागणूकही या समस्यांना कारणीभूत ठरते. ग्रामीण स्त्रियांना मानसिक ताण, मधुमेह असले आजार होत नाहीत. पण त्या बळी पडतात; निष्कृष्ट आहार आणि संसर्गजन्य रोगामुळे.

नित्कृष्ट आहार मिळत असलेल्या मुलांना आणि मोठ्यंना क्षय  वगैरसारख्या रोगांगाना आपन बळी पडू देतो ? धर्नुवात आणि जंतूमुळे होणाऱ्या रोगांना बळी पडून आईवर मरणाची पाळी का यावी ? निरपराध आयुष्ये अशी फुकाफुकी वाया जाऊ नयेत यासाठी आपल्याला कितीतरी प्रतिबंधक उपाय योजनाची माहिती असते. मग त्याची दुःख अजून वाढतच का आहेत ? ग्रामीण स्त्रिया आणि मुलं यांची सध्याची जी अवस्था आहे त्याच्या मुळाशी हेच कारण नाही का ? स्त्री आणि मुल सध्या उपासमारीत असतात त्याचं वर्णन करता येणं शक्य नाही. त्यात पुन्हा नव्या मुलांना जन्म देणं आणि ती वाढवणं या जबाबदाऱ्या ग्रामीण स्त्रीला शेतात कष्टाची कामं करावी लागतात. समाजाच्या इच्छेला येईल तसं स्त्रीनं वागावं अशी सध्याची स्थिती आहे. सामाजिक रूढी बंधनामुळं स्त्रिया आणि मुली शिक्षणापासून वंचित राहतात. जरी स्त्री ही घरातली मिळवती अशी प्रमुख घटक असली तरी घरात तिला तसं मानाच स्थानही नाही आणि निर्णय घेण्याचं स्वातंत्र्यही नाही. ती मूकपणे सारं सोशीत राहाते. ग्रामीण स्त्री ही आज रूढीबंधन आणि द्रारिद्र्य, उपासमार यांच्या कात्रीत सापडलेली आहे.

यासाठी स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाकरता त्यांनी स्वतःच पायावर उभं राहायला हवं. त्याचं आरोग्य सुधारण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी स्वतःहून सुधारणेच्या मार्गावर उब्या राह्याल्याशिवाय सरं व्यर्थ आहे. ग्रामीण स्त्री ही पैलू न पाडलेल्या धूळीत पडलेल्या हिऱ्यासारखी असते. ही गरीब आणि अशिक्षित स्त्री संधी मिळाली तर खात्रीनं पुढं येऊ शकेल इतकी तिच्यात शक्ती आणि गुण वास करीत असतात. जामखेड भोवतालच्या खेड्यातील गोरगरीब अशिक्षित स्त्रीच्या बाबतीत हे निश्चितपणे सांगता येईल. मात्र तिला संधी मिळाली पाह्यजे. त्यांच्यातल्या सुप्तशक्तीवर आपण विश्वास ठेवायला हवा आणि त्यांना संधी द्यायला हवी. तशी ती या स्त्रियांना दिल्यावर त्याच्यातले बदल जाणवू लागेल आहेत. खरं पाहाता प्रत्येक स्त्रीला आपली शक्ति क्षमता माहिती असतेच असं नाही. सातत्यानं प्रयत्न केल्यामुळं या स्त्रियांना आता आपली  (ग्रामीण स्त्रीला शेतात कष्टाची कामं करावी लागतात. समाजाच्या इच्छेला येईल तसं स्त्रीला वागावं लागतं अशी सद्यःस्थिती आहे. ) स्वतःची माहिती होऊ लागली आहे. त्या आता पुढं येऊन कर्तृत्वाची नवनवीन क्षितिज शोधू लागल्या आहेत. समाजाकडून त्यांच्यावर मुलांवर होणाऱ्या अन्यायाविषयी त्या जागरूक झाल्या आहेत. आणि त्या या समस्यांना तोंड देण्यासाठी मार्ग काढू लागल्या आहेत.

या जामखेड भोवतालच्या अशिक्षित स्त्रियांनी अगदी कमी वेळातच बालमृत्यूचं प्रमाण कमी करून दाखविलं आहे. त्याचबरोबर खेड्यापाड्यातल्या आरोग्यातही सुधारणा होऊ लागली आहे. त्या गावातल्या लोकांना अनिष्ठ रूढीपरंपराविरुद्ध उभं करू लागल्या आहेत. आणि त्याचबरोबर गावागावातून शिक्षणाचा प्रसार करायला मदत करून समाजजीवन सुधारायला हातभार लागत आहे.केवळ शालेय किंवा विद्यापीठीय शिक्षण घेतल्यानंच आरोग्य सुधारायला मदत होत आहे असं वाटणं चुकीचं आहे. ग्रामीण भागातील लोकांना एखादी गोष्ट पटवून सांगितली, तर त्या गोष्टी ते बरोबर उचलतात. त्यासाठी त्यांना विश्वासात घेणं आवश्यक असतं. त्यामुळे ते शिकतातही आणि दुसऱ्यांना शिकविण्यास मदतही करू शकतात. विशेषतः स्त्रियांना असं शिकवलं तर त्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून मोठ्या हौसेनं लोकशिक्षणासाठी पुढे येतात. त्यांना त्यांचा समाज पूर्णपणे माहिती असल्यामुळे त्या महिला मंडळे सुरू करून स्त्रियांना एकत्र आणून त्यांच्यात जागृती करू शकतात. आरोग्य न्याय आणि समता याच्यासाठी त्या खंबीरपणे उभ्या राहू शकतात.

आरोग्याच्या दृष्टीनं जागृत झालेल्या ग्रामीण स्त्रियांना नेहमीचे आजार, बालसंगोपण प्राथमिक उपचार, आरोग्य, शिक्षण, पाणी, आहार यासंबंधी माहिती दिली, त्यांना प्रशिक्षित केलं तर त्या आपल्या गावातल्या स्त्रियांना निश्चितपणे सुधारू शकतील. आम्ही केलेल्या अशा प्रयोगामुळे बालमृत्यूचं प्रमाण जामखेड भागात हजारात फक्त चाळीस बालमृत्यू इतक खाली आलं आहे.स्त्री आणि बालकांच्या आरोग्य आणि व्यक्तिविकासाच्या अशा योजनेला जास्ती खर्चही लागत नाही. महागडे डॉक्टर्स किंवा खर्चिक तंत्रज्ञानही लागत नसतं. लोकजागृती करणं एवढंच मुख्य असतं. ग्रामीण स्त्रियांत आत्मविश्वास उत्पन्न करणं हे महत्त्वाचं काम आहे. त्याचे आरोग्य विषयक प्रश्न त्यांना सोडविता येतात यामुळे त्यांना आनंद आहे. यासाठी त्या स्त्रियांशी एकुण समाजाशीच सातत्यानं संपर्क असण महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांना उत्साह येतो. उत्तेजन मिळतं आत्मविश्वास निर्माण होतो. आपले प्रश्न आपण सोडवितो आहोत या आनंदानं त्या अधिकाधिक काम करू लागतात. आणि अशा अर्थानं ग्रामीण स्त्रिया सुशिक्षित झाल्या  की मग त्यांचे त्यांनाच कळायला लागेल की आरोग्य हा केवळ हक्कच नसून ती एक जबाबदारीही आहे. आणि एकदा जबाबदारीची जाणीव निर्माण झाली की व्यक्ती, समाज आणि देश सर्वांगीण विकासाच्या दिशेनं वेगान वाटचाल करू लागेल यात शंका नाही.