Tag Archives: डोळ्यातले चांदणे

डोळ्यातले चांदणे

डोळ्यातले चांदणे अजूनही फिके फिकेच आहे.
गल्का तेवढा पाखरांचा तरीही झाड मुकेमुकेच आहे

संपेल कधी ही वाट वेडी अंधारलेली
शुभ्रतेला पंख नाही सगलकडेच धुके धुकेच आहे

काजळी डोळ्यात विझल्या वादळाच्या सर्व खुणा
अंतरीच्या पावलांचे चालणे रूके रूकेच आहे

भोवताली तळपणारे उन्ह हे भासे निखाऱ्यापरी
बहरवेड्या अंतरंगाचे लहरणे फुकेफुकेच आहे.