Tag Archives: ढेमसी

शाही भरलेली ढेमसी

साहित्य:

 • २५० ग्रॅम ढेमसी
 • २५० ग्रॅम पनीर
 • ४ आलू बुखारे
 • २ कांदे
 • २ मोठे टॉमेटो
 • १ लहान चमचा साखर
 • १ छोटा चमचा जीरे
 • १/२ लहान चमचा मीठ
 • १ लहान चमचा धणे पावडर
 • १/२ लहान चमचा काळी मिरी पावडर
 • १/४ लहान चमचा हळद
 • २ मोठे चमचे तूप

कृती:

ढेमसी सोलून घ्या व मधून मोकळी करा. कढईत तूप टाकुन ढेमसी लालसर भाजा व वेगळी काढून ठेवा. टॉमेटो, कांदा, आलू बुखार व जीरा एकत्र मिक्सरमधून काढा व उरलेल्या तूपात परता.

परतून झाल्यावर त्याच्यात साखर, मीठ, हळद, धणे व काळी मिरी टाकून आणिक परता. पनीर हातने कुचकरून मीठ व काळी मिरी टाकून ढेमसी भरा. सर्व ढेमसी ग्रेवीत टाका. थोडे पाणी टाकून शिजवा.

कोथिंबीर, गाजर लावून सजवा व वाढा.