Tag Archives: तन्दूर

तन्दूरी चिकन

साहित्यः

  • १ कि. चिकन
  • १ कापलेला कांदा
  • २ लिंबाचे काप
  • १ जुडी कोथिंबीर
  • २ मोठे चमचे कापलेला लसुण पेस्ट
  • २ मोटे चमचे कापलेले आले
  • २२५ ग्रा. दही
  • १ मोठा चमचा मीठ
  • २ चमचे मिरची पावडर
  • १ चमचा गरम मसाला
  • १/२ चमचा वाटलेली मेथी
  • १ चमचा चाट मसाला
  • १ चमचा काळी मिरी वाटलेली
  • ४-६ थेंब खायचा रंग

कॄतीः

तन्दूरी चिकन

तन्दूरी चिकन

लसुण व आल्याची पेस्ट बनवावी, लसुण, आले पेस्ट दही मीठ, मिरची पावडर, गरम मसाला, वाटलेली मेथी, चाट मसाला, काळी मिरी आणि लाल रंगास एका ग्लासात ८-१० मिनीटे फेटावे व एक सारखे करावे.

चिकन चांगल्या तऱ्हेने फेटावे. मसाले टाकावे आणि मसालल्यास चिकनवर चांगल्या तऱ्हेने रगडावे. नंतर ४-६ वेळा चिकन उलट, पालट करावे.

मेरीनेटड चिकन तन्दूर मध्ये बेक करावे किंवा ओवन २२० डिग्री सेल्सि, ४२५ सेल्सि. गॅस मार्कवर ७ वर सेट करावे. तारांच्या ट्रे वर ठेवून १० मिनीट बेक करावे नंतर पलटवून १० मिनीट बेक करावे.

तुकडे करून किंवा मनपसंद अंदाजाने लिंबू व कोथिंबीर टाकावी व गरम गरम खावे.