
खाशाबा जाधव
- लष्कर दिन
- जॉन चिलेम्ब्वे दिन – मलावी.
- कोरियन लिपी दिन – उत्तर कोरिया.
ठळक घटना
- १७६१ : पानिपतचे तिसरे युध्द संपले
- १९१९ : छत्रपती शाहू महाराजांनी स्पृश-अस्पृशांना एकत्रित शिक्षण व्यवस्था सुरु केली.
- १९९६ : भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा, संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले.
- १९९९ : ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.
जन्म
- १९२६ : खाशाबा जाधव, भारतीय कुस्तीगीर.
- १९२९ : डॉ.मार्टिन लुथर किंग, अमेरिकन नागरी अधिकार चळवळीचा नेता.
- १९५६ : मायावती, भारतीय राजकारणी.
मृत्यू
- १९७१ : दीनानाथ दलाल महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार यांचे मुंबईत निधन.
- १९९८ : गुलझारीलाल नंदा, माजी भारतीय पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते.
- २००२ : विठाबाई भाऊ नारायणगावकर, राष्ट्रपतीपदक विजेत्या तमाशा कलावंत.