Tag Archives: तहलका

काळा पैसा लपवणारी १५ नावे उघड

काळा पैसा लपवणारी १५ नावे उघड

काळा पैसा लपवणारी १५ नावे उघड

जर्मन बँकांमध्ये काळा पैसा लपवून ठेवणार्‍या १५ व्यक्तींची नावं ‘तहलका‘ मासिकानं गुरुवारी प्रसिद्ध केली आहेत. या नावांची यादी भारत सरकारकडे १८ मार्च २००९ रोजी सोपवण्यात आली होती. परंतु जर्मन सरकारने घातलेल्या अटींमुळे ही यादी गुप्त ठेवण्यात आली होती. ती तहलकानं फोडल्यामुळे केंद्रीय अर्थखात्यात खळबळ उडाली आहे.

वास्तविक, भारत सरकारला मिळालेल्या यादीतील सर्व नावांची चौकशी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळातर्फे सुरू होती. हा तपास अंतिम टप्प्यात आला होता. त्यात दोषी आढळणार्‍या व्यक्ती आणि संस्थांवर, इन्कम टॅक्स नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई होणार होती. परंतु, त्याआधीच तहलका मासिकानं १५ नावं उघड करून केंद्र सरकारला ‘जोर का झटका’ दिला आहे. सरकारच्या यादीत दोन बड्या असामींची नावं असल्याचं समजतं, त्याबद्दल तहलकानंही कमालीची गुप्तता राखली आहे.

तहलकाने प्रसिद्ध केलेल्या यादीत १२ व्यक्तींची नावे आहेत तर बाकी तीन नावे ही व्यापारी संस्थांची आहेत. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या महितीनुसार ही नावे प्रामुख्याने चेन्नईस्थित एका व्यापारी परिवारातील असून अन्य व्यक्ती हिरे व्यापारी आहेत.

या यादीत..

 • मनोज धुपेलिया
 • रुपल धूपेलिया
 • मोहन धूपेलिया
 • हंसमुख गांधी
 • चिंतन गांधी
 • दिलीप मेहता
 • अरुण मेहता
 • अरुण कोचर
 • गुणवती मेहता
 • रजनीकांत मेहता
 • प्रबोध मेहता
 • अशोक जयपुरीया

..या व्यक्तींचा समावेश आहे. तसेच

 • राज फाऊंडेशन
 • उर्वशी फाऊंडेशन
 • अंब्रुनोवा फाऊंडेशन

या संस्थांचाही त्यात समावेश आहे.

तहलकाने नावे घोषित करण्यापूर्वी या प्रत्येक व्यक्तीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणीही या संदर्भात आपली भूमिका मांडण्यासाठी समोर आले नाही. त्यानंतर ही नावे तहलकाने उघड केली. आणखी एका बड्या नेत्याचे आणि एका मोठ्या उद्योग समूहाच्या अध्यक्षाचे नाव या यादीत असून त्याबद्दल पूर्ण माहिती गोळा करेपर्यंत ही नावे जाहीर करण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.