Tag Archives: तांदळाची पिठी

पिठीची कडबोळी

साहित्य :

  • ३ वाट्या तांदळाची पिठी
  • १ डाव हरबऱ्याची डाळ
  • १ टे. चमचा लोणी
  • १०-१२ हिरव्या मिरच्या
  • १ टे. चमचा तीळ
  • ५-६ पाकळ्या लसूण
  • १ चमचा ओवा
  • मीठ
  • तळणीसाठी तेल.

कृती :

पिठाइतके पाणी मोजून घ्या व उकळायला ठेवा. उकळी आली की त्यात डाल सबंधच घाला. जरा उकळले की त्यात पीठ, लोणी, वाटलेल्या मिरच्या, लसूण, ओवा घालून उतरवा. जरा वेळ झाकून ठेवा. थंड झाले की मळून कडबोळी करून तळा.

मधे मधे हरबऱ्याची डाळ लागते. चवीला वेगळीच म्हणून ही कडबोळी छान लागतात.