Tag Archives: तिखट

तिखट भाकरी

साहित्य :

  • अर्धी वाटी रवा
  • अर्धी वाटी मैदा
  • ३ कांदे
  • ५-६ मिरच्या
  • १ वाटी ओले खोबरे
  • १०-१२ कढीलिंबाचे पाने
  • ३-४ वाटी दही
  • १ चमचा मीठ
  • तळण्यास तूप

कृती :

तिखट भाकरी

तिखट भाकरी

कांदे, मिरच्या, कढीलिंब बारीक चिरून त्यात ओले खोबरे मिसळावे व एकत्र कुस्करावे.

त्यात मीठ व पीठे घालून दह्याने मिश्रण भिजवावे.या पीठाचे चार किंवा पाच भाग करावे. केळी पानाच्या तूपाचा हात भिरवावा व भाकरी थापावी.

तवा तापला की चमचा तूप तव्यावर सारावावे. व थापलेली भाकरी अलगद तव्यावर टाकावी. दोन्ही बाजूने तूप सोडून चुरचुरीत बदामीसर रंगावर भाजावी.