Tag Archives: तुझी पावलं

तुझी पावलं

तू असतेस तेव्हा जाणवत नाही
एवढ्या प्रकर्षाने तुझे अस्तित्व
जाऊ लागतेस दूर जेंव्हा
कळतनाही
कुठून येतात भिरभिरणारी पाखरं
अन घालू लागतात घिरट्या
क्षणभर ही न स्थिरावता…

तुझ्या विचाअ फांद्यानीं
कसे बसे बहरून येत असतांना
माझे पानगळीचे दिवस दिवस
पुन भेटतात मला नव्याने
अन पेटवू पाहतात माझ्यात
एका वादळाने भरलेल्या
वणव्यास ज्यामुळे
होऊनजाऊ अस्तित्वहीन आपण

असतील उभ्या जरी
तुझ्या जाण्याच्या क्रमप्राप्त भिंती
माझ्या भक्कम पायावर
तरी देखील कळत नाही
का डळमळत राहतात जातांना
तुझी पावलं