Tag Archives: तुपावरचा चिवडा

तुपावरचा चिवडा

साहित्य :

 • ५०० ग्रॅम पातल पोहे
 • १ वाटी भाजलेले दाणे
 • पाऊण वाटी डाळे
 • पाऊण वाटी खोबऱ्याचे पातळ काप
 • पाव वाटी खोबरे कीस
 • १ चमचा जिरे
 • १२ ते १५ हिरव्या मिरच्या
 • अर्धी वाटी डालडा
 • जिरे
 • हिंग
 • हळद
 • साखर २ वाट्या
 • बटाट्याची तळलेली सळी
 • मीठ.

कृती :

पातेल्यात थोडे तूप घाला. नंतर त्यावर पोहे घालू भाजा.वरील पोहे २ वेळा भाजा. हताने चुरून पहा. कुरकुरीत झाले म्हणजे उतरा व कागदावर ओतून पसरून ठेवा.खोबऱ्याचा कीस, जिरे व हिरव्या मिरच्या वाटून घ्या.डालडा तुपाची जिरे व हिंग घालून फोडणी करा. त्यात हळद घाला. खोबऱ्याचे काप परतून घ्या .दाणे व डाळे घालून परतावे. वाटलेल्या मिरच्या घालून जरा ढवळावे. वाटलेल्या मिरच्यांचा ओलेपणा गेला की पोहे घालून ढवळावे. मीठ, साखर घालून सर्व मिश्रण चांगले ढवळावे. खाली उतरवून त्यात बटाट्याची सली घालून ढवळावे.तुपावर केल्यामुळे जास्त दिवस हा चिवडा राहिला तरी वास येत नाही.