Tag Archives: तुफ़ान

माझं भाषण मी कसं करु ?

मार्क ट्वेन आणि चॉंसी डेफ़्यू हे दोधे इंग्रजी साहित्यिक एकदा एकत्रपणे बोटीनं प्रवास करीत होते.एके दिवशी रात्री त्या आगबोटीच्या डेकवर आयोजीत मेजवाणीला, बोटीतल्या प्रवाशांनी मार्क ट्वेन व डेफ़्यू या दोघांनाही निमंत्रित केलं.

मेजवाणीनंतर प्रवाशांनी मार्क ट्वेनला भाषण करण्याची विनंती केली. आपल्या अत्यंतवि नोदे आणि खुशखुशीत अशा भाषणानं मार्क ट्वेन यानं उपस्थित प्रवाशांना एकदम खुष करुन सोडलं. त्यानंतर सर्वांनी डेफ़्यू याला भाषण करण्याची विनंती केली.

मार्क ट्वेन याच्या बहारदार भाषनानंतर आपण कितीही जरी चांगलं बोललो, तरी त्या भाषणापुढे आपले भाषण फ़िलेच पडणार, हे हेरुन भाषणाला उभे राहिल्याचा नुसता आव आनून डेफ़्यू म्हणाला, सज्जन हो, माझे मीत्र श्री. मार्क ट्वेन यांना व मला जेव्हां या मेजवाणीसाठी व नंतरच्या भाषणासाठी निमंत्रीत केलं गेलं, तेव्हा आम्ही दोघांनी आपल्या भाषणाच्या प्रति लिहून तयार करुन, त्यांची अदलाबदल करण्याचं ठरवलं. त्याप्रमाणे मार्क ट्वेन यांनी आता जे अत्यंत सुंदर भाषण केल, ते खरं म्हटलं तर मी काढलं होतं. परंतू दुर्दैव असं की, त्यांनी लिहून माझ्या हाती दिलेल्या भाषणाची प्रत मी इकडे येत असता माझ्या हातून समुद्रात पडली ! मग आत अते भाषण मी आपल्यापुढे कसं करु ?
चॉंसी डेफ़्यूच्या या खुलाशानं त्या श्रोत्यात जे हास्याचं तुफ़ान माजलं, त्यामुळे ती आगबोटही काही वेल हेलकावत राहिली.