Tag Archives: दलेर मेहंदी

१८ ऑगस्ट दिनविशेष

जागतिक दिवस

ठळक घटना

  • १२०१ : रिगा शहराची स्थापना.
  • १५८७ – रोआनोक वसाहतीच्या गव्हर्नर जॉन व्हाइटची मुलगी व्हर्जिनिया डेर ही अमेरिकेत जन्माला आलेली सर्वप्रथम इंग्लिश व्यक्ती ठरली.
  • १९०९ – टोक्योच्या महापौर युकिओ ओझाकीने वॉशिंग्टन डी.सी. शहरास २,००० चेरीच्या झाडांची भेट दिली. अद्यापही ही झाडे पोटोमॅक नदीकाठी आहेत.
  • १९१७ : थेसालोनिकी, ग्रीसला आग लागू शहराचा तिसरा भाग भस्मसात.
  • १९२० : अमेरिकेच्या संविधानातील १९वा बदल लागू झाल्याने स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळाला.
  • १९४१ : नागरिकांच्या दबावापुढे झुकून ऍडॉल्फ हिटलरने मतिमंद व्यक्तींचे शिरकाण तात्पुरते थांबवले.
  • १९६३ : जेम्स मेरेडिथ हा मिसिसिपी विद्यापीठातून स्नातक होणारा पहिला श्यामवर्णीय व्यक्ती झाला.
  • १९७१ : व्हियेतनाम युद्ध – ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलँडने आपले सैनिक व्हियेतनाममधून काढून घेण्याचे ठरवले.
  • १९८३ : हरिकेन ऍलिशिया टेक्सासच्या किनार्‍यावर आले. २२ ठार, १ अब्ज अमेरिकन डॉलरचे नुकसान.
  • २००५ : जावामध्ये वीज गेल्यामुळे १० कोटी लोक अंधारात.
  • २००८ : पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफने राजीनामा दिला.

जन्म

  • १६९२ : लुई हेन्री, डुक दि बर्बन, फ्रांसचा पंतप्रधान.
  • १६९९ : थोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे पेशवे.
  • १७५० : आंतोन्यो साल्येरी, इटालियन संगीतकार.
  • १७७४ : मेरीवेदर लुईस, अमेरिकन शोधक व साहसिक.
  • १७९२ : जॉन रसेल, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
  • १८३० : फ्रांझ जोसेफ पहिला, ऑस्ट्रियाचा सम्राट.
  • १८७२ : विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक.
  • १९६२ : फेलिपे काल्डेरॉन, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९६७ : दलेर मेहंदी, भारतीय गायक, नर्तक.
  • १९८० : प्रीती झंगियानी, हिंदी चित्रपट अभिनेत्री.

मॄत्यु

  • १२२७ : चंगीझ खान, मंगोल सम्राट.
  • १२७६ : पोप एड्रियन पाचवा.
  • १५०३ : पोप अलेक्झांडर सहावा.
  • १५५९ : पोप पॉल चौथा.
  • १६२० : वान्ली, चिनी सम्राट.
  • १७६५ : फ्रांसिस पहिला, पवित्र रोमन सम्राट.
  • १८५० : ऑनोरे दि बाल्झाक, फ्रेंच लेखक.
  • १९४० : वॉल्टर पी. क्रायस्लर, अमेरिकन उद्योगपती.
  • १९४५ : नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय स्वातंत्रसेनानी.
  • १९९८ : पर्सिस खंभाता, भारतीय अभिनेत्री.
  • २००८ : नारायण धारप, मराठी लेखक.
  • २००९ : किम दे-जुंग, दक्षिण कोरियाचा १५वा राष्ट्राध्यक्ष.
  • २००९ : रॉबर्ट नोव्हाक, अमेरिकन पत्रकार.