Tag Archives: दहनक्रिया

ब्राम्हमुहूर्त फायदे

१ सामान्यतः व्यायाम करण्यासाठी आवश्यक असा वेळ सकाळी लवकर उठल्याने मिळू शकतो. उशिरा उठल्याने असा वेळ काढता येणे कदाचित शक्य होणार नाही. दुसऱ्या अनेक कामांच्या व्यवधानात व्यायाम जेमतेम उरकून टाकला जाणे शक्य आहे.

२ व्यायाम करताना श्वासोश्वासाची क्रिया जलद होत असते. धूळ व इतर रजकणांचे प्रमाण हवेत तेव्हा कमी असते. साहजिकच श्वासांत अशुद्ध हवा जास्त प्रमाणात जाऊ शकते.

३ प्रभात काळी किंवा सकाळ लवकर ‘ओझोन’ हा वायू हवेत थोड्या प्रमाणात असू शकतो. दिवस उगवल्यावर तो नाहीसा होतो. ऑक्सिजनचे अधिक घट्ट स्वरूप म्हणजे ओझोन. या वायूत दहनक्रिया करण्याची शक्ती अधिक प्रमाणात असते. शरीरात तो जास्ती प्रमाणात वापरणे शक्य झाले तर शरीरातील अशुद्धीची साफसुफी जास्त चांगल्या जास्त चांगल्या रीतीने होऊ शकते.

४ झोपल्यावर सामान्यपणे एकदा तरी सकाळी लवकर आपल्याला जाग येतेच. तेव्हाच निद्रात्याग करावा. त्यावेळी शरीरात इतर वेळी असते त्यापेक्षा अधिक स्फुर्ती असते. व्यायाम करण्यात त्या वेळी मन तन्मय होऊ शकते. मनापासून केलेली प्रत्येक क्रिया जास्त फलदायी होते.

५ एकदा जाग आल्यावर परत झोपून उठल्यावर शरीरात पहिल्यासारखा उत्साह किंवा जोम नसतो. उशिरा उठणाऱ्या पुष्कळ लोकांचे सांगणे आहे की उठल्यावर शरीरात जराही तरतरी नसते. उलट आळस जास्त येत जातो. कामात मन लागत नाही.

६. झाडे, पाने, फुले यातून प्रभातकाळि जो सुगंध पसरतो, त्यामुळे चित्ताला अपूर्व प्रसन्नता लाभते. प्रभातकाळचे एकंदर वातावरणच अती आल्हादजनक असते.

७. सकाळी लवकर उठून पाणी प्यायल्यास मूळव्याध, सूज, हृदयविकार, वृद्धत्व, स्थूलपणाने येणारी आजारपणे, मूत्रघात, रक्तपित्त, मस्तिकाची दुखणी, डोळ्यांचे विकार इत्यादीशिवाय, वात, कफ व पित्तजन्य इतर रोगांचा प्रादुर्भाव होणे थांबते अथवा ते होत नाहीत.