Tag Archives: दहशतवादविरोध

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे प्रतिपादन

प्रणव मुखर्जी

प्रणव मुखर्जी

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदेतल्या आपल्या पहिल्या भाषणात प्रतिपादन केले की, दहशतवादाविरोधातील लढा हे चौथे महायुद्ध आहे. त्यांनी प्रथम देशाच्या सर्वोच्च स्थानी निवडून दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. त्यांनी ग्वाही सुद्धा दिली की ते राष्ट्रहिताचाच विचार करतील व याचा विसर कधीही पडू देणार नाही.

मुखर्जी यांनी आपल्या भाषणात काही ठळक मुद्दे मांडले. ते म्हणाले की, सर्वांना शांततेची महती माहीत आहे पण युद्धाचा धोका अजूनही टळलेला नाही. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला जे युद्द झाले, त्याला आपण शीतयुद्ध जरी म्हटले तरी, त्याचे चटके आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेत जाणवले आहे. आता दहशतवादाचे चौथे महायुद्ध पेटले आहे. यात सीमेवरील हल्ले आपले सैनिक परतवत आहेत, देशांतर्गत पोलिस शत्रूंचा नायनाट करीत आहेत आणि नागरिकही तेवढेच महत्त्वाचे काम करीत आहेत. दहशतवादी हल्ल्यांनंतर नागरिकांनी शांत राहून जी प्रगल्भता दाखविली आहे, त्याला तोड नाही.