Tag Archives: दहिवडा

उपवासाचा दहिवडा

साहित्य :

 • उकडून घेतलेले बटाटे मध्यम आकाराचे चार
 • दीड वाटी उपवासाची भाजणी
 • राजगिरा व शिंगाडा पीठ प्रत्येकी एक चहाचा चमचा
 • दाणेकूट एक कप
 • दही मोठ्या तीन वाट्या
 • हिरव्या मिरच्या २/३
 • जिरे एक चिमूट
 • आले वाटण एक चहाचा चमचा
 • तिखट
 • मीठ
 • चिरलेली थोडी कोथिंबीर
 • तूप तळणीसाठी

कृती :

उपवासाचा दहिवडा

उपवासाचा दहिवडा

एका परातीत उकडून साले काढलेले बटाटे, दाणे कूट, सर्व पीठे, तिखट, मीठ घ्या. सर्व पदार्थ एकजीव मळून घ्या.

या मिश्रणाचे लाडूच्या आकाराचे लहानसर गोळे करा. कढईत तूप गरम करा. हे गोळे लालसर रंगावर तळून घ्या.

नंतर एका रुंद तोंडाच्या भांड्यात किंवा पसरट बाऊलमध्ये दही घ्या. त्यात मिरची, आले वाटण, मीठ घाला. दही तसेच पाणी न टाकता रवीने घुसळून घ्या. यात तळलेले गोळे टाका.

वरून चिरलेली कोथिंबीर पेरा आवडत असेल तर काही वेळ फ्रिजमध्ये ठेवा. नंतर खा.