Tag Archives: दह्यातला साबुदाणा

दह्यातला साबुदाणा

साहित्य :

  • साबुदाणा दोन वाटी
  • दही दोन वाटी
  • दाणेकूट अर्धी वाटी
  • थोडे तूप
  • थोडे जिरे
  • चवीपुरती साखर
  • मीठ
  • मिरची ठेचा

कृती :

साबुदाणे कोरडे असतानाच थोडे भाजून घ्या. ते मऊसर भिजवून घ्या. पसरट भांड्यात साबुदाणा, दाणेकूट, साखर, दही, मीठ, थोडा मिरचीचा ठेचा घाला. सर्व मिश्रण कालवून घ्या. जिऱ्याची तुपात फोडणी करून या मिश्रणावर घाला. कालवून घ्या. दही-भाता प्रमाणे खा. चवदार होतो.