Tag Archives: दि यलो चिली कुकबुक

यलो चिलीची नाविन्यपुर्ण मेजवानी

दि यलो चिली कुकबुक, संजीव कपूर

दि यलो चिली कुकबुक, संजीव कपूर

खवय्यांची नगरी असलेल्या पुण्यात प्रसिद्ध शेफ संजीव कपूर ने आपल्या वेगळ्या डिशेसनी खवय्यांना भुरळ घातली आहे. शेफ संजीव कपूरच्या कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या येलो चिली या चेन रेस्टारन्ट मध्ये स्टार्टरपासून डेझर्ट पर्यंत विविध आणि नावीन्यपूर्ण डिशेस आणि त्याही आबालवृध्दांच्या आवडीच्या यामुळे सदाशिव पेठी खवय्येची पावलं आपसूकच पंजाबी तडका चाखायला वळत आहे. तंदूरवाले छाप, मलाईदार मलाई टिक्का, कलकत्ताचं खास तगडा पनीर, शाम सवेरा लल्ल मुसा दाल, पुरण सिग का तर्रीवाला मुर्ग काय वाचून सूटलं तोंडला पाणी. याचवरोबर लहान मुलांसाठी त्यांच्या पंसतीच्या फ्राईड राईस, फ्रॅकींज, चिकन चॉप्स, नुडल्स, चॉकलेट कूकी शेक अशा अनेक व्हरायटी उपलब्ध आहे यामूळे बच्चे कंपनी एकदम खूष. कॉर्पोरेट बूफे लंच, विकेन्ड लंच बूफे यात दर्जेदार आणि खिशाला परवडणाऱ्या पाककृतींचा आस्वाद घेता येतो. याशिवाय अल फ्रेस्को फूड ही आहेत यात १२ प्रकराची लज्जतदर स्टार्टर आहेत.

शेफ संजीव कपूरने खास पुणेकरांसाठी स्पेशल मेन्यू तयार केला आहे. हा मेन्यू खूप विचार करून तयार केला असल्याचं संजीव कपूरनी सांगितलं तसचं अनैसर्गिक रंगाशिवाय त्याचबरोबर पारंपारिक पध्दतीने मंद आचेवर बनवलेलं खाद्यपदार्थ ही येलो चिलीची प्रमुख वैशिष्ट्य आहेत. संजीव कपूरच्या ‘दि यलो चिली कुकबुक’ या आंतराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पुस्तकाचं ही यावेळी सादरीकरण करण्यात आले.

रोमॅन्टिक डिनर, मॅरेज अ‍ॅनिवर्सरी, बर्थ डे पार्टी, कीटी पार्टी, गेट टूगेदर यासाठी येलो चिली नक्कीच वेगळा पर्याय ठरू शकेल.