Tag Archives: दुध्याचा हलवा

दुध्याचा हलवा

साहित्य :

  • दीड किलो दुध्या भोपळा
  • ३ वाट्या साखर
  • पाव किलो खवा
  • अर्धी वाटी तूप
  • ७-८ वेलदोड्याची पूड
  • थोडी चारोळी
  • वर्खाचा कागद.

कृती :

दुध्या किसून घ्या. पाणी काढून टाका. नंतर कीस वाफवून घ्या.दुध्याचा कीस व साखर एकत्र करून गॅसवर ठेवा. घट्टसर झाले की त्यात खवा घाला. वेलदोड्याची पूड, चारोळी घालून शोभिवंत भांड्यात काढा. गरम आहे तोवरच वर्खाचा कागद लावा.