Tag Archives: दुध्याची रबडी

दुध्याची रबडी

साहित्य :

  • २५० ग्रॅम दुध्या भोपळा
  • ५ ब्रेडचे स्लाईस
  • ४ ते ५ कप दूध
  • अर्धा डाबा कंडेन्स्ड मिल्क
  • २५ ग्रॅम काजू तुकडा
  • पाव चमचा रोझ इसेन्स
  • ५-६ वेलदोड्याची पूड
  • २ टे. चमचा डालडा.

कृती :

दुध्या भोपळा किसून घ्या. नंतर तुपावर दुध्या कीस घालून परतून व शिजवून घ्या.ब्रेडच्या स्लाईसच्या कडा काढून टाका व ब्रेड तोड्या दुधात भिजत घाला. चांगली भिजली की पुरणयंत्राला २ नंबरची जाळी लावून त्यातून काढा. उरलेले दूध व कंडेन्स्ड मिल्क एकत्र करा व शिजलेल्या दुध्याभोपळ्यावर ओतून मिश्रण सारखे करा. त्यातच ब्रेड घातलेले दूध घाला. वेलदोड्याची पूड व रोझ इसेन्स घाला. गॅसवर ठेवून जरा ढवळा व उतरवा. कोमट झाले की शोभिवंत भांड्यात काढा व फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करा व वाढा.