Tag Archives: देश

देशात सध्या दुष्काळी परिस्थिती नाही

 शरद पवार

शरद पवार

देशात सध्या दुष्काळी परिस्थिती आलेली नाही. पण अजूनही मान्सून निष्क्रियता दाखवित आहे. त्यामुळे आता देशातील शेतकऱ्यांपुढे आता शेताच्या उत्तम कामगिरीचे आव्हान आले आहे, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी असे मत व्यक्त केले.

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या ८४ व्या स्थापना दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात पवार आपले विचार मांडत होते. पवार म्हणाले की, मध्य महाराष्ट्र व कर्नाटकातील पावसाच्या आणि पिकाच्या स्थितीमुळे काळजी निर्माण झाली आहे. सरकारपुढे गेल्या दोन वर्षातील विक्रमी धान्याच्या व्यवस्थापनाचे आव्हान आहे.

देशभरातील पावसाच्या स्थितीत सुधारणा दिसून येत आहे. दहा दिवसांपूर्वी पावसाची जी स्थिती होती, त्यापेक्षा चांगला पाऊस सध्या पडत आहे. पण मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकातील स्थिती जरा गंभीरच आहे. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर या संदर्भात चर्चा झाली आहे. पावसाच्या अभावामुळे या राज्यांमध्ये ज्वारी-बाजरी व मका ह्या भरड धान्याला धोका आला आहे.

पवार यांनी सांगितले की, एखादवेळेस पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न आपल्यापुढे येऊ शकतो. ही सर्वांत चिंताजनक बाब आहे. केरळमध्ये ५ जूनला मान्सूनचे आगमन झाले पण मान्सूनने अपेक्षित प्रगती दाखवली नाही. आणखी एक प्रतिकूल स्थिती म्हणजे पेरण्यांना झालेला विलंब, असा मुद्दा मांडून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.