Tag Archives: द्राक्षे

रिच पुडिंग

रिच पुडिंग

रिच पुडिंग

साहित्य :

 • ६-७ ब्रेडचे स्लाईसेस
 • १ वाटी साखर
 • २ टे. स्पू. काजू – अक्रोडचे बारीक काप
 • ८-१० सिडलेस द्राक्षे
 • ८-१० चेरी
 • २ टे. स्पू. टुटी फ्रुटी
 • २ वाटी दूध
 • २ वाटी ताजी साय
 • ४ अंडी
 • १ टी. स्पू. लवंग-दालचिनी-जायफळची मिक्स पूड
 • व्हॅनिला इसेन्स

कृती :

अंड्याचा पांढरा भाग व साखर एकत्र फेटावे. पिवळा भाग वेगळा फेटावा. ब्रेडचा चुरा करावा. दूध गरम करावे. ब्रेडचा चुरा, सर्व फ्रुट्स, मिक्स पूड, इसेन्स, फेटलेले अंड्याचे मिश्रण, साय हे सर्व मिश्रण चांगले ढवळून सारखे करुन ग्रीझ केलेल्या पुंडिंग मोल्डमध्ये ओतून घ्यावे. वरुन चेरी व टुटी फ्रुटी पसरवून ओव्हनमध्ये १८० डि. वर बेक करावे, २५-३० मिनिटांत पुडिंग तयार होते. तयार पुडिंग सर्व्ह करताना द्राक्षे व चेरी टाकून सर्व्ह करावे.