Tag Archives: धनुष्य

म्हातारा आणि तरूण

एक अविचारी तरूण मनुष्य रस्त्याने चालला असता, म्हातारपणामुळे ज्याचा देह धनुष्यासारखा वाकून गेला आहे असा एक मनुष्य त्याच्या दृष्टीस पडला. मग तो त्यास म्हणतो, ‘बाबा, तुमचे हे धनुष्य मला विकत देता का ?’ म्हातारा उत्तर करितो, ‘तुम्ही पैसे खर्चून हे धनुष्य विकत घेण्यापेक्षा थोडे दिवस थांबाल तर विनापैशाने असलेच धनुष्य तुम्हास मिळेल; कारण तुम्हाला म्हातारपण आले म्हणजे तुमच्याही देहाचे असेच धनुष्य होणार आहे !’ हे ऐकताच तो तरूण मनुष्य खाली मान घालून निमूटपणे चालता झाला.

तात्पर्य:- वृद्ध मनुष्यांस त्यांच्या वार्धक्यामुळे प्राप्त झालेल्या वैगुण्याबद्दल त्यांची थट्टा करून त्यात आनंद मानणे हे पशुत्व होय.