Tag Archives: नववर्षादिन

कॉन्व्हेंट शाळा

इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंट प्रवृत्तीच्या शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यांच्याजवळ असणारा पैसा व आमचे धर्मनिरपेक्षतेचे विकृत धोरण हे कारण त्यापाठीमागे आहेच. पण मुलांना कॉन्व्हेंट शाळेत घालणे हे प्रतिष्ठितपणाचे लक्षण मानले जाते, हे प्रमुख कारण आहे. शाळेत घालेपर्यंत जी मुले आई-बाबा म्हणत होती ती आता ‘ मम्मी-डॅडी ’ म्हणायला लागतात. ख्रिस्ती मिशन्सच्या शाळांतील मुलांतून देवाला हात जोडून नमस्कार करण्याचा संस्कार जातो आणि ती मुले छातीला हात लावून आकाशाकडे पाहू लागतात. आपल्या चालीरीती, देव, धर्मग्रंथ यांची निंदानालस्ती ऐकायची त्यांना सवय होते. ख्रिसमस व नववर्षादिन हे महत्त्वाचे सन बनतात. गणेशोत्सवासारख्या आपल्या धर्मानुसार महत्त्वाच्या दिवशी सुट्टी दिली जात नाही. मुलींच्या बांगड्या व कुंकू तसेच लांब केस यांना रजा दिली जाते. ख्रिस्तावरून कृष्णाची संकल्पना आहे हे मनांवर बिंबवले जाते. सरस्वती वंदना व वंए मातरम मुलांच्या कानावरच पडत नाही. परिणामतः मुले घरापासून, आपल्या समाजापासून, परंपरागत उन्नत संस्कारांपासून तुटतात. आवश्यक तर मुले इंग्रजी बोलायला आपल्या शाळेतूनही शिकू शकतील. माध्यमिक शिक्षणापर्यंत मातृभाषाच हवी हा आग्रह सर्वांनी घरायला हवा.