Tag Archives: नाताळ

सेलिब्रेशनला केकची संगत

ख्रिसमस केक

ख्रिसमस केक

आजकाल सेलिब्रेशन साठी कुठलही निमित्त पुरेसं असतं आणि त्यातूनही सेलिब्रेशन म्हटलं की, केक मस्ट आहे. केक म्हणजे डेजर्ट अशी मर्यादित ओळख आता केक ची राहिली नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच भूरळ घालणाऱ्या या केकची डिसेंबर महिन्यात भरपूर व्हरायटी दिसते. केक आणि डिसेंबर महिना याचं अतूट नातं आहे असं म्हणायला हरकत नाही. नाताळ, नववर्ष, लग्नसराई आणि पर्यायाने येणाऱ्या मॅरेज अ‍ॅनिवर्सरीज या सर्वांच्या सेलीब्रेशनसाठी गरज असते ती केकची. आकर्षक सजावट आणि त्यांची वैविध्यता यामूळे हे केक पाहणे ही नेत्रसूखद अनुभव असतो. बेल्स, सॅन्टा, ख्रिसमस ट्री तसचं क्रीमचा वापर करून बर्फाचा आभास खास सजावट या केक वर करण्यात आली आहे. या केकबरोबर खास ख्रिसमस आणि न्यु ईयर स्पेशल गीफ्ट पॅकही उपलब्ध आहेत. खास डिसेंबर महिन्यासाठी रिच चॉकलेट, चॉकलेट लॉग, सेलिब्रेशन चोको चेरी, मिक्स फ्रूट, न्यू इयर चॉकलेट असे विविध केक बाजारात आले आहेत. रिच चॉकलेट, बॅल्क फॉरेस्ट या केकना जास्त मागणी आहे. सेलिब्रेशन चोको चेरी या नव्याने बाजारात आलेल्या केक मध्ये हॅझल नट चॉकलेट आणि चेरी विथ चेरी हे कॉम्बिनेशन खरचं तोंडाला पाणी आणणारं आहे. या क्रिम केक व्यतिरिक्त प्लेन केकचा ही वेगळाच चाहता वर्ग आहे. यात मावा केक,रम केक, प्लम केक,रिच प्लम केक, चॉकलेट ब्रावनी, मावा केक विथ टुटी फ्रूटी, कॉफी मारवल असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. प्लेन केक मध्ये कॉफी मारवल यंदा बाजारात आलेला नविन केक आहे. या केक मध्ये कॉफी आणि ड्राय फ्रूटचे अफलातून कॉम्बीनेशन आहे. काही ईराणी बेकऱ्यांची प्लेन केक ही खास स्पेशॅलिटी असते. पुर्वी हिंदू धर्मात पाव किंवा केक खाणं निषिध्द होतं. केक वगैरे खाणं म्हणजे बाटले गेल्याची लक्षणे मानली जात. परंतु आता मंगल प्रसंगी केक ही तितकेच गरजेचे झाले आहेत. त्यातूनही एगलेस केकमूळे शाकाहारीही तितकेच आवडीने या केकवर तूटून पडतात.

ख्रिसमस केक

ख्रिसमस केक

नुसतंच डिसेबर महिन्यासाठी नव्हे तर वर्षभरात येणाऱ्या मराठमोळ्या सणांसाठी केक उपलब्ध आहे. दिवाळी, दसरा, रक्षाबंधन याबरोबरच मदर्स डे, फादर्स डे यासरख्या डेज साठी पण वेगवेगळे केक आहेत. वेगवेगळया भावना व्यक्त करण्यासाठीही आता केकची मदत घेतली जाते. सॉरी, थॅक यू, मिस यू, या भावना व्यक्त करणारे आणि आकर्षक सजावट असणारे केक आता तरूणाईची पहिली पंसती ठरू लागले आहेत. पुर्वी वाढदिवस आणि केक असं समीकरण असायचं परंतू आता सेलिब्रेशन म्हणजेच केक असं नवं समीकरण तयार झालं आहे.