Tag Archives: नारळ

कोकोनट बिस्किट्स

कोकोनट बिस्किट्स

कोकोनट बिस्किट्स

साहित्य:

  • १ वाटी मैदा
  • १ वाटी लोणी किंवा डालडा
  • पाऊण वाटी पिठीसाखर
  • १ चमचा व्हॅनिला
  • अर्धा चमचा खायचा सोडा
  • ५० ग्रॅम बाजारी खोबर्‍याचा कीस
  • थोडे दूध

कृती:
तूप व साखर एकत्र करुन फेसावे. नंतर त्यात मैदा, व्हॅनिला, खोबर्‍याचा कीस (थोडा वगळून) मिसळावे. सोडा घालावा. आवश्यक तेवढे दूध घालून पुरीच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवावे.

त्याची जाड पोळी लाटून गोल बिस्किटे कापावी. खोबर्‍याच्या किसात एका बाजूने बुडवून ट्रे मध्ये लावून गरम ओव्हनमध्ये भाजावीत.