Tag Archives: न्यायमुर्ती महादेव रानडे

हा तर सर्व धर्मांचा पाया

न्यायमुर्ती महादेव रानडे यांच्या घरी एकदा एक ख्रिश्वन धर्मप्रसारक गेला होता. इअकडे तिकडे बघत असता, त्याला त्यांच्या टेबलावर एकावर एक अशा शिस्तीत रचून ठेवलेल्या सात आठ ग्रंथाच्या दुडीत, सर्वात वर बायबल हा धर्मग्रंथा ठेवल असल्याचं आढळून आला.

तेवढ्यात हरकून केलेला तो धर्मांध धर्मप्रसारक रानड्यांना म्हणाला, न्यायमुर्ती, तुमच्या टेबलावर ठेवलेल्या सात आठ ग्रंथाच्या उभ्या दुडीत ज्या अर्थी तुम्ही आमचं बायबल हे सर्वात वर ठेवलं आहे, त्या अर्थी बायबल हा सर्व धर्मांच्या इमारतीवरचा जणू कळसच असल्याचं तुम्ही मान्य करता, असं नाही का होत?
यावर जरागी वेल न दवडाता न्यायमुर्ती म्हणाले, पण या धर्मग्रंथाच्या तळाशी ज्या अर्थी मी भगवतगीता ठेवली आहे, त्या अर्थी गिता हा सर्व धर्माच्या इमारतीचा पाया पक्का आहे., असा अर्थ नाही का होत?

न्यायमुर्तीच्या या उत्तरानं तो धर्मोपदेशक एकदम शरमिंदा झाला आणि लगेच दुसऱ्या विषयाकडे वळला.