Tag Archives: पंख

फुलपांखरुं

फुलपांखरुं !
छान किती दिसतें..फ़ुलपाखरुं

या वेलीवर । फुलांबरोबर
गोड किती हसतें । फुलपांखरुं

पंख चिमुकले । निळेजांभळे
हालवुनी झुलते । फुलपांखरुं

डोळे बरिक । करिती लुकलुक
गोल मणी जणुं ते । फुलपांखरुं

मी धरुं जाता । येई न हाता
दूरच ते उडते । फुलपांखरुं