Tag Archives: पंचमेल

पंचमेल डाळ

साहित्य:

 • १/२ कप चण्याची डाळ
 • १/२ कप मसुर डाळ
 • १/२ कप उडीद डाळ
 • १/२ कप तुर डाळ
 • १/२ कप मुग डाळ
 • १/२ चमचे हळद
 • ३/४ चमचे लाल मिरची
 • १/२ चमचे जीरे
 • १ तुकडा कापलेले आले
 • सव्वा चमचे मीठ
 • १ मोठा चमचा तुप
 • २ पाकळी लसूण
 • १ जुडगी कापलेली कोथिंबीर
 • २ ग्लास पाणी
 • १ बारीक कापलेला कांदा
 • १/२ कप चमचे आमचूर
 • १/२ चमचे गरम मसाला
 • २ कापलेली टोमॅटो

कृतीः

पंचमेल डाळ

डाळींना चांगल्या पद्धतीने धुवून कूरकरमध्ये टाकाव्या व हळद, मीठ तसेच २ ग्लास पाण्याबरोबर गॅसेवर ठेवावे. ४ शिटी नंतर गॅस बंद करावा व वाफ आपल्याआप निघू द्यावी. कढईत तूप गरम करून जीरे टाकावे. नंतर कांदा व लसूण टाकावा व हलवून लालसर फ्राय करावे. लाल मिरची व टोमॅटो टाकुन घालावे, १ मिनीट फ्राय केल्यानंतर आले, आमचूर व गरम मसाला टाकावा, २ मिनीटानंतर फ्राय केलेल्या मसाल्यास डाळीत टाकवे वरून कोथंबीर टाकावी व एक उकळी आल्यानंतर उतरून द्यावी.