साहित्य:
- ५० ग्रॅम तूरडाळ
- ५० ग्रॅम उडीद डाळ
- जीरे
- हिरव्या मिरच्या
- २ टॉमेटो
- हिंग
- ५० ग्रॅम चणाडाळ
- ५० ग्रॅम मूगडाळ
- ५० ग्रॅम मसूरडाळ
- आंबट पावडर
- १ तुकडा आले
- मीठ चवीप्रमाणे
- हळद
- धणे पावडर
- कोथिंबीर
- तूप
कृती:

पंचरत्नी डाळ
सर्व डाळी निवडून, धुऊन पाणी टाकून तासभर ठेवा. एका पातेल्यात आवश्यकते प्रमाणे टाकून शिजवण्यासाठी डाळी टाका.
एक उकळी आल्यावर टॉमेटो व मीठ टाका. बाकी सर्व मसाले टाका.
सर्व डाळी शिजल्यावर गॅस बंद करा.
कढईत तूप गरम करून कांदा, आले, हिंग, जीरे परतून घ्या व याची डाळीला फोडणी द्या. कोथींबीर टाकून वाढा.