Tag Archives: पकोडा

रिबन पकोडा पापडीप्रमाणे

साहित्य :

  • २ वाट्या तांदळाचे पीठ
  • १ वाटी डाळीचे पीठ
  • तिखट
  • मीठ
  • ओव्याची पूड
  • थोडे कडाकडीत तेलाचे मोहन.

कृती :

सर्व एकत्र करून गार पाण्यात पीठ भिजवा व लगेचच करा.शेवेच्या सोऱ्याबरोबर एक पट्ट्यापट्ट्याची ताटली मिळते. ती सोऱ्यात बसवून नंतर पीठ घाला. कढईत तेल तापत ठेवा व तेल तापले की वरील सोऱ्या एकदा आडवा फिरवा व कडेने लगेच पापडी सोडवून घ्या. ३ ते ४ इंच लांबीच्या पट्ट्या तयार होतील. लालसर रंगावर तळाव्या.

खायला कुरकुरीत व छान लागतात.