Tag Archives: पकौडा

कढी पकौडा

साहित्यः

 • २०० ग्रा. बेसन
 • २५० ग्रा. आंबट दही
 • दीड चमचे मीठ
 • १/२ चमचे हळ्द
 • १/२ चमचे जीरे
 • १ चमचा मिरची
 • १ जुडी कापलेली कोथिंबीर
 • १ चुटकी हिंग
 • ८-१०  पाने कढीपत्ता
 • २ लाल मिरची
 • १ मोठा चमचा तेल फोडणीसाठी
 • तळणासाठी अतिरिक्त तेल

कॄतीः

कढी पकौडा

कढी पकौडा

कढईत तेल गरम करण्यास ठेवावे अर्ध्या बेसनात मीठ, मिरची, हींग, जीरे टाकून भिजवावे व पकौडे तळून घ्यावे.

दह्यात २ ग्लास पाणी टाकुन मिळवावे नंतर उरलेले बेसन मिळवावे व मोठ्या तोंडाच्या भांड्यात शिजण्यासाठी ठेवावे.

हळद, मिरची, मीठ आणि कोथिंबीर टाकुन आणखी १०-१५ मिनीट ठेवावे नंतर उरतवून पकोडे टाकुन द्यावे.

तेल गरम करून कढी पत्ता आणि लाल मिरची तळून कढीत वरून टाकावी भात व फुलक्यांबरोबर गरम गरम वाढावी.