Tag Archives: पांढरे तीळ

तिळाची बर्फी

साहित्य :

  • २५० ग्रॅम पांढरे तीळ
  • १०० ग्रॅम काजू तुकडा
  • ३०० ग्रॅम साखर
  • १ वाटी दुध
  • अर्धा चमचा रोझ इसेन्स.

कृती :

तीळ भाजून घ्यावे. फार भाजू नयेत. पांढरे पांढरे दिसतील इतपतच भाजावे. नंतर तिळाची व काजूची पूड करून घ्या.साखर व दूध एकत्र करून पाक करावा. गोळीबंद पाक झाला की त्यात रोझ इसेन्स व काजूची व तिळाची पूड घालावी. चांगले ढवळावे. लगेचच तूप लावलेल्या थाळीत ओतून थापा व वड्या पाडा.