Tag Archives: पारधी

गरुडपक्षी आणि तीर

एक गरुडपक्षी एका उंच कडयावर बसून ससा टेहळीत असता, एका तिरंदाज पारध्याने त्यास पाहिले आणि अचूक नेम धरून तीर सोडला. तो तीर त्या गरुडाच्या मर्मस्थानी लागून तो अगदी मरणोन्मुख झाला. मरता मरता उरात शिरलेल्या तिराकडे त्याची नजर गेली आणि पाहतो तो त्या तिराच्या पिसाऱ्यास त्याचीच पिसे लावलेली त्याच्या दृष्टीस पडली. तेव्हा तो म्हणाला, ‘माझ्या पंखांतील पिसांनी ज्याचा पिसारा सज्ज केला आहे, अशा तिराने मी मरावे, याबद्दल मला दुप्पट वाईट वाटते.’

तात्पर्य:- आपल्यावर आलेले संकट आपल्याच लोकांच्या मदतीने उत्पन्न झालेले पाहून, त्याबद्दलचे दुःख दुणावते.