Tag Archives: पिंगळा

पिंगळा आणि कावळा

पिंगळा नावाचा एक पक्षी आहे, तो भूतभविष्य जाणतो अशी लोकांची समजूत आहे. तो ओरडू लागला म्हणजे त्याच्या शब्दावरून काही बऱ्या वाईट गोष्टी काही लोक ठरवितात पिंगळा कसा ओरडतो हे एका कावळ्याने ल्क्षपूर्वक पाहिले आणि त्याचे अनुकरण करून आपणही भविष्यवादी व्हावे म्हणून तो रस्त्यातून काही लोक चालले होते, त्यांच्या मस्तकावर आकाशात उडून पिंगळ्यासारखे शब्द करून मान डोलवू लागला . ते शब्द ऐकून त्या मनुष्यांस पाहिल्याने थोडे आश्चर्य वाटले, परंतु त्यांनी जेव्हा वर पाहिले, तेव्हा तो ढोंगी कावळा दृष्टीस पडताच, ते त्याचा उपहास करीत चालते झाले.

तात्पर्य:- नुसत्या पोषाखाने आणि हावभावांनी मनुष्यास योग्यता येत नाही; ती मुळचीच असावी लागते.