Tag Archives: पिस्ता

नारळाची बर्फी

साहित्य:

  • ओला नारळ ( ७००-८०० ग्रॅम वजनाचा )
  • १ किलो दूध
  • ३५० ग्रॅम साखर
  • अर्धा चमचा वेलची पावडर
  • १ लहान चमचा कापलेला पिस्ता

कृती:

ओला नारळ कापून घ्या. आता दूध, नारळ व साखर मिसळून जाड तळाच्या कढईत उकळा. मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. एका ताटात तूपाचा हात लावून मिश्रण ताटात पसरा. वेलची पावडर व पिस्ता वरुन भुरकावा. बर्फीच्या आकारात कापून घ्या.