Tag Archives: पुस्तक

भरत दाभोळकर यांच्या हस्ते जीवनफंडा पुस्तक प्रकाशित

भरत दाभोळकर यांच्या हस्ते जीवनफंडा प्रकाशित

भरत दाभोळकर यांच्या हस्ते जीवनफंडा प्रकाशित

डॉ. स्वप्ना पाटकर यांच्या ‘जीवन फंडा’ या पुस्तकाचे प्रकाशन जाहिरात क्षेत्रातील नामवंत भरत दाभोळकर यांच्या हस्ते झाले. सोबत खासदार संजय राऊत, उद्योजक विठ्ठल कामत, अमेय प्रकाशनचे उल्हास लाटकर.

माणसांच्या आयुष्यात अनेक ताणतणाव, स्पर्धा असतात. त्यातून जीवनाचा आनंद मिळविण्यासाठी डॉ. स्वप्ना पाटकर यांचे ‘जीवन फंडा’ उपयोगी पडेल, असे प्रमाणपत्र प्रख्यात उद्योजक व लेखक विठ्ठल कामत यांनी दिले. ‘सामना’त प्रसिद्ध होणार्‍या ‘कॉर्पोरेट मंत्र’ या स्तंभातील निवडक लेखांचा संग्रह ‘जीवन फंडा’ म्हणून अमेय प्रकाशनने प्रसिद्ध केला. डॉ. स्वप्ना पाटकर यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हॉटेल ‘ऑर्किड’ येथे पार पडला. यावेळी जाहिरात क्षेत्रातील नामवंत भरत दाभोळकर, ‘सामना’चे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत, अमेय प्रकाशनचे उल्हास लाटकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील नामवंत हजर होते.

‘जीवनफंडा’ हे प्रेरणादायी असून संघर्ष करणार्‍यांसाठी शिखरावर पोहोचण्याचा मार्ग असल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

डॉ. स्वप्ना पाटकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.